शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:22 AM

अंगणवाडीसेविका, मदतनीस भरतीलाही बंदी घातल्याने महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग जेरीस आला आहे.

अकोला : कोरोना विषाणूशी लढा देताना महिला, बालक, किशोरी यांच्यासह सामाजिक आरोग्याबाबत महत्त्वाची भूमिका असणाºया अंगणवाडीसेविका, मदतनीस भरतीलाही बंदी घातल्याने महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग जेरीस आला आहे. रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला असून, किमान या पदांची भरती शासनाने करावी, असा प्रस्ताव अनेक जिल्हा परिषदांकडून सादर केला जात आहे. त्यावर शासन आता कोणती भूमिका घेते, यावरच ही भरती प्रक्रिया अवलंबून आहे.ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासाच्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांची राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नागरी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाकडे असलेल्या विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्याशिवाय गरोदर, स्तनदा माता, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, किशोरी योजना, कुपोषण रोखण्याचे उपक्रमही प्रभावित होत आहेत. ती रिक्त पदे भरण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी शासनानेही पदे तातडीने भरण्याचा आदेश दिला; मात्र त्यानंतर कोरोना विषाणूच्या संकटामुळे राज्य आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कोणत्याही विभागातील कोणत्याही रिक्त पदांची भरती पुढील आदेशापर्यंत करू नये, असाही आदेश शासनाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिला. त्यामुळे आता आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागात अत्यावश्यक सेवेतील कामे करणाºया सेविकांची ही पदे कशी भरावी, अशी समस्या आता जिल्हा परिषदा, महापालिका, नगर परिषदांसमोर आहे. ही पदे न भरल्यास कोरोना प्रतिबंधाच्या विविध उपाययोजना प्रभावित होत आहेत. त्यामुळे ती पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव अनेक जिल्हा परिषदा, महापालिकांकडून शासनाकडे सादर केला जात आहे.

 रिक्त पदांचे अहवाल तयारविशेष म्हणजे, शासनाच्या आधीच्या निर्देशानुसार अंगणवाडी, मदतनिसांच्या रिक्त पदांचे ग्रामीण, नागरी प्रकल्पांनी तयार केले. त्यानंतर भरती थांबवण्याचा आदेश शासनाने दिला.अंगणवाडीसेविकांची सेवा या काळात अत्यावश्यक म्हणून समजली जाते. त्यामुळे त्यांची पदभरती करणे आवश्यक असल्याचे अनेक पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अकोला जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनिसांची २१५ पदे रिक्त आहेत. आता ती भरतीच थांबली आहे. भरती प्रक्रिया राबवताना अंगणवाडी सेविकांची पदे मदतनिसांना पदोन्नतीने थेट भरली जातील. त्यानंतर शिल्लक राहिलेली सेविकांची पदे व मदतनिसांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. आता राज्यभरात ती संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. प्रकल्पनिहाय सेविका, मदतनिसांची रिक्त पदेप्रकल्प सेविका मदतनीसअकोला ग्रामीण-१ ०४ १७अकोला ग्रामीण-२ ०६ १४बार्शीटाकळी ०५ १२अकोट १८ २२तेल्हारा १३ २५बाळापूर ११ १६मूर्तिजापूर १० १८पातूर १३ ११

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या