--कोट--
प्रोटोझोअल रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित जनावरांवर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहे. काही जनावरांकडून प्रतिसाद मिळत असून जनावरे चांगली झाली आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
डॉ.तुषार बावणे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन
--कोट--
पाच-सहा जनावरांचे अहवाल पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. आठ-दहा दिवसांत अहवाल येणार आहे. तसेच स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. जनावरेही उपचारावर प्रतिसाद देत आहे.
डॉ.नम्रता वाघमारे, प्रयोगशाळा प्रमुख
--बॉक्स--
प्रोटोझोअल रोगामुळे असे होतात परिणाम
प्रोटोझोअल रोग गोचिडांमुळे होणारा आजार आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हा परजीवी रोग आहे. हा आजार झालेल्या जनावरांना आठ दिवसात उपचार मिळणे गरजेचे असते असे, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
--बॉक्स--
उपचारावर खर्च जास्त
या आजारांच्या जनावरांवर उपचाराचा खर्च जास्त असतो. हा उपचार शासकीय पशु वैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध नाही. याकरिता खासगीतून उपचार घ्यावा लागत असून एका इंजेक्शनचा खर्च दोन हजार रुपयांपर्यंत जातो.