लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अकोलेकरांचा जीव धोक्यात आला आहे. अशा जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा करणे भाग असताना महापालिका प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील मुख्य कोंडवाडे रिकामे असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य अकोलेकरांना भेडसावणाºया या समस्येकडे सत्ताधारी भाजपकडूनही कानाडोळा केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठ असो वा गल्लीबोळात मोकाट जनावरे, कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे चित्र पाहावयास मिळते.मोकाट जनावरे रस्त्यांवर ठिय्या देत असल्याने वाहनांना अपघात होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येचा सर्वसामान्य अकोलेकरांना वैताग आला असला तरी मनपा प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोंडवाड्यासाठी प्रशासनाकडे सहा ठिकाणी जागा उपलब्ध आहे. यापैकी केवळ जुने शहरातील शिवचरण मंदिरासमोरील कोंडवाड्याचा थातूर-मातूर वापर केला जातो. तर शिवापूर येथील कोंडवाड्याचा नावापुरता वापर केला जात आहे.शहरवासी मोकाट जनावरांच्या समस्येने हैराण असताना प्रशासन कोणत्याही उपाययोजना करीत नसल्यामुळे प्रशासनातील जबाबदार अधिकारी नेमके कोणते कर्तव्य बजावत आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.कोंडवाडा विभाग निष्क्रियमोकाट जनावरे व श्वान पकडण्यासाठी कोंडवाडा विभागाकडे वाहने उपलब्ध आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. वाहनांना लागणारे दैनंदिन इंधन, कर्मचाºयांच्या वेतनावर होणारा खर्च पाहता पशुपालकांकडून वसूल केल्या जाणाºया दंडात्मक रकमेपेक्षा प्रशासनाचा खर्च अधिक होत असल्याची माहिती आहे. असे असतानाही मोकाट जनावरांना पकडण्यात हा विभाग निष्क्रिय ठरल्याचे चित्र आहे.
कोंडवाडे रिकामे; मोकाट जनावरे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 1:52 PM