---------------------------------
‘ब्रेकर’ ठरत आहेत धोकादायक
बाळापूर : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.
---------------------------
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
तेल्हारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची निर्मीती होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
-----------------------------------------------
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू!
अकोट: वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
--------------------------------------------------
विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य!
बार्शीटाकळी: जिल्ह्यास्तरावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. येथील विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, अस्वच्छता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------------
निहिदा परिसरात पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य
निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा, पिंजर गावात पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो. अंधारामध्ये ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------------
वाडेगाव-माझोड रस्ता ठिकठिकाणी उखडला
वाडेगाव: वाडेगाव- माझोड रस्त्याचे काम सुरू असून, हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ये-जा याच रस्त्याने असते. गावातील नागरिक काम व व्यवसायानिमित्त दररोज अकोला येतात; मात्र, रस्ता उखडल्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.