अकाेला : काेराेना संकटात सारेच अर्थचक्र थांबले असले तरी मानवतेची गाडी मात्र सुसाट आहे. या संकटाने ज्यांना घेरले आहे अशा काेराेनाबाधितांसह त्यांच्या नातेवाइकांना दाेन वेळ सात्विक जेवण पुरविण्यासाठी अकाेल्यातील छत्रपती फाउंडेशन धावून आले आहे. या फाउंडेशनकडून अन्नपूर्णा अमृत अभियानाच्या माध्यमातून दरराेज सकाळ-संध्याकाळ ३०० डबे माेफत पुरविले जात आहेत.
छत्रपती फाउंडेशन या एकाच नावाखाली ४० जणांची चमू कार्यरत आहे. अध्यक्ष, सचिव अशा लाैकिक अर्थाने या छत्रपती फाउंडेशनमध्ये काेणीही कार्यरत नाही; पण हे फाउंडेशन माझे आहे याच भावनेतून आपला दैनंदिन व्याप सांभाळत समाजकार्यासाठी मदतीचा हात मनापासून देणारे सहकारी आहेत. काेराेना संकट सुरू झाल्यापासून काेराेना रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प छत्रपती फाउंडेशनने केला. रुग्ण हाॅस्पिटलमध्ये दाखल असताे; मात्र त्यांच्या नातेवाइकांची माेठी ससेहाेलपट हाेते. कमाईचे कुठलेही साधन नाही, हाॅस्पिटलच्या खर्चाचा डाेंगर यामुळे नातेवाइकांनी जेवणाकडे दुर्लक्ष करून प्रकृती धाेक्यात टाकू नये तसेच जेवणासाठी त्यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बाेजा पडू नये यासाठी छत्रपती फाउंडेशनने पुढाकार घेतला व राेज सकाळ-संध्याकाळ ४ पोळ्या आणि भाजी असे ताजे सात्विक जेवण पुरविण्याचा संकल्प अविरत ठेवला आहे
बाॅक्स.....
दरराेज ३०० लाेकांना जेवण
छत्रपती फाउंडेशनने प्रसारित केलेल्या फाेन नंबरवर दरराेज सकाळी १५० च्या जवळपास काॅल येतात. त्या काॅलनुसार डब्यांची संख्या व पत्ता नाेंदविला जाताे. दुपारी व संध्याकाळी न चुकता डबा रुग्ण व त्यांचा नातेवाइकांसाठी ते ज्या हाॅस्पिटलमध्ये आहेत तिथे पाेहोचविला जाताे.
बाॅक्स...
पाेलीसदादांचीही घेतात काळजी
काेराेना याेद्धा म्हणून अविरत सेवेत असलेल्या पाेलिसांचीही छत्रपती फाऊंडेशन काळजी घेते. शहरातील पाेलीस चाैकींमध्ये तैनात असलेल्या पाेलिसांसाठी नाश्ता, चहा व थंड पाणी पुरविण्याचे काम काेराेना काळात छत्रपती फाउंडेशनने केले आहे.
बाॅक्स....
सॅनिटायझेशनसाठीही पुढाकार
छत्रपती फाउंडेशन एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करते. शहरातील पाेलीस स्टेशन, रुग्णालय, काेराेना संक्रमित वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशनचे काम करण्यासाठी त्यांची एक चमू कार्यरत आहे.
बाॅक्स...
नाव नकाे, फाेन नंबर द्या
आपल्या परिवारातील सदस्य हॉस्पिटलमध्ये काेणी भरती असेल त्या रुग्णाची व आपली जेवणाची गैरसोय होत असेल तर काळजी करू नका. आम्ही आहाेत, असा आधार देताना छत्रपती फाउंडेशनचा एकही सदस्य आमचे नाव नका विचारू, 9503938834 हा फाेन नंबर घ्या व काेणाला गरज लागली तर त्यांना अवश्य द्या, असा आग्रह धरतात.