विनू मंकड स्पर्धेत जम्मू काश्मीर, झारखंड, सौराष्ट्र, कर्नाटक व पॉन्डेचेरी या संघांचा समावेश आहे. यापूर्वी अदनानने गुजरात येथे झालेल्या १७ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
खेळाडूंच्या निवडीबद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलास शहा, ऑडिटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, जावेद अली, परिमल कांबळे, रवी ठाकूर, सुमेध डोंगरे, अमित माणिकाराव, पवन हलवणे, शारीक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, प्रवीण मुळे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
------------------
अदनान कमाल व झुबेरउद्दीन यांनी सराव सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्यांची विदर्भ संघात निवड झाली आहे.
भरत डिक्कर, जिल्हा संयोजक, व्ही.सी.ए.