शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक निरीक्षणास सुरुवात

By admin | Published: January 05, 2017 2:41 AM

दोन दिवस मुक्काम; गुन्हय़ांचा घेतला आढावा

अकोला, दि. ४- अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वार्षिक निरीक्षणास ४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी डॉ. जाधव यांनी बाळापूर विभागातील बाळापूर, उरळ पोलीस ठाण्यासह शहर विभागातील पोलीस ठाण्यांमधील कामकाजाचे, गुन्हय़ांचे व पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस परेडचे निरीक्षण केले. वार्षिक निरीक्षणासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जाधव आणखी दोन दिवस शहरात थांबणार आहेत. दरवर्षी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांचे निरीक्षण व कामकाजासंबंधीचा आढावा घेण्यात येतो. यंदासुद्धा विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी विभागनिहाय पोलीस ठाण्यांचे निरीक्षण सुरू केले आहे. बुधवारी डॉ. जाधव व त्यांच्या चमूने बाळापूर, उरळ पोलीस ठाण्यांसह शहरातील पोलीस ठाण्यांमधील कामकाजाचा आढावा घेतला, तसेच दाखल झालेले गुन्हे आणि निकाली काढण्यात आलेल्या गुन्हय़ांचा गोषवारासुद्धा त्यांनी तपासला. यासोबतच पोलीस ठाण्यांमधील शस्त्रागार, पोलीस कर्मचार्‍यांचे कीट परीक्षण आणि परेडचेसुद्धा निरीक्षण केले. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निरीक्षण केल्यानंतर ठाणेदारांना आवश्यक त्या सूचनासुद्धा केल्या आणि कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाअधिक गुन्हे निकाली काढण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट केले. गत दोन वर्षांमध्ये जिल्हय़ातील गुन्हेगारी बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. त्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षकांसह ठाणेदारांचे कौतुक केले आणि जिल्हय़ातील गुन्हेगारी कशी कमी होईल, या दृष्टिकोनातून सर्व ठाणेदारांनी समन्वय राखून काम करावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अ ितरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब नाईक, मूर्तिजापूरच्या एसडीपीओ कल्पना भराडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.