महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी ८६ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७५ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये उमरी येथील तीन, निमखर्डा, ता. बाळापूर व कुटासा, ता. अकोट येथील प्रत्येकी दोन, तर बाळापूर, रामनगर, सिंधी कॅम्प व डाबकीरोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह
सोमवारी दिवसभरात झालेल्या ६५ चाचण्यांमध्ये केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत करण्यात आलेल्या २७,७०९ चाचण्यांमध्ये १८९१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
२० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, युनिक हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले तीन, अशा एकूण २० जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७८७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,१८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,०८८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७८७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.