कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, मध्यंतरी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला होता. कोविशिल्ड लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने केवळ दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे ज्यांना कोविशिल्ड लस घ्यायची आहे, अशांना लसीच्या पहिल्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यासाठी शुक्रवारी लसीचे १४ हजार ८६० डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कोविशिल्ड लसीचा साठा जास्त असल्याने आता पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना लस मिळणे शक्य झाले आहे.
विभागासाठी १ लाख ७७ हजार डोस प्राप्त
जिल्हा - उपलब्ध लस
- कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड
अकोला - २८६० - १२०००
अमरावती - १०२०० - ३१०००
बुलडाणा - १३००० - ३३०००
वाशिम - १६००० - १६०००
यवतमाळ - ८५०० - ३५०००
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी विभागासाठी लसीचे १ लाख ७७ हजार ५६० डोस प्राप्त झाले. उपलब्ध लसीचे वितरण पाचही जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाचा वेग कायम राहणार आहे.
- राजेंद्र इंगळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, अरोग्य विभाग