तालुकानिहाय रुग्ण संख्या
मूर्तिजापूर- ३२
अकोट- १९
बाळापूर- ०९
तेल्हारा- ३०
बार्शीटाकळी- ०८
पातूर- ०८
अकोला- २०३ (अकोला ग्रामीण-९९, अकोला मनपा क्षेत्र-१०४)
५७५ जणांची कोरोनावर मात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, देवसार हॉस्पिटल येथील तीन, समाजकल्याण वसतिगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पिटल येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथील १०, लोहना हॉस्पिटल येथील एक, जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील तीन, सोनोने हॉस्पिटल येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, बबन हॉस्पिटल येथील पाच, यकीन हॉस्पिटल येथील १५, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, नवजीवन हॉस्पिटल येथील चार, सहारा हॉस्पिटल येथील तीन, देशमुख हॉस्पिटल येथील एक, फातिमा हॉस्पिटल येथील एक, अथर्व हॉस्पिटल येथील चार, काळे हॉस्पिटल येथील दोन, अवघाते हॉस्पिटल येथील दोन, आधार हॉस्पिटल येथील एक तर होम आयसोलेशनमधील ४३५ अशा एकूण ५७५ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,४४७ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६,२७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३९,०१२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.