अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २० जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,७०७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्री नगर येथील तीन, खडकी, संतोष नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, जुने शहर, गोडबोले प्लॉट, आझाद कॉलनी, निंभोरा, गंगानगर, सिंधी कॅम्प, शासकीय क्वॉटर, कीर्ती नगर, कृषी नगर व कपिलवास्तू येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७३६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,७०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.