अकोला : जिल्ह्यात शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,६५३ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून् शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये आदर्श कॉलनी येथील तीन, जठारपेठ, शंकर नगर जठारपेठ व शिवकृपा क्लिनिक येथील प्रत्येकी दोन, ज्ञानेश्वर नगर डाबकी रोड, देशमुख फैल, कान्हेरी सरप, गोरक्षण रोड, अंबिका रेसिडेन्सी, अंजनगाव सुर्जी, बार्शीटाकळी, केशव नगर, धारेल, सुकोडा, तेल्हारा, टाकळी, आलेगाव ता. पातूर, नित्यानंद नगर, मुर्तिजापूर व दत्ता कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.२५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,६५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८११४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:40 PM