अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, शनिवार, २ जानेवारी रोजी आणखी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०५३४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ३७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३५१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील तीन, कमल सोसायटी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर वर्धमान नगर, पातूर, गीता नगर, दुर्गा चौक, आश्रय नगर, जठारपेठ, खडकी, कोर्ट क्वॉटर, न्यू तापडीया नगर, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, गोकुल कॉलनी, कृषी नगर, गोरक्षण रोड, खदान व शांती नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४५२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,५३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,७४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४५२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.