अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,७५० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये विजय हाऊस सोसायटी येथील चार, खडकी येथील तीन, जीएमसी, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी दोन, कौलखेड, पारस, न्यू राधकीसन प्लॉट, ज्योती नगर, गोरक्षण रोड, दत्ता कॉलनी, सिटी कोतवाली, पीआयएल कॉलनी, आकाशवाणी कॉलनी, विठ्ठल नगर, कैलास टेकडी, निंबोळी ता. तेल्हारा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.३२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७५० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:36 PM