अकोला : गत पाच महिन्यांपासून धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. रविवार, २३ आॅगस्ट रोजी सकाळी २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४६७ वर गेली आहे.विदर्भात नागपूर व अमरावतीनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अकोला जिल्ह्यात आढळून येत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे २३५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल २०९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १२ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील नऊ जण, तेल्हारा तालुक्यातील चांगेफळ व पाथर्डी येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर, राजराजेश्वर नगर, शिवसेना वसाहत, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.३८३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोल्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३४६७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:15 PM