अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, सोमवार, दि. ४ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,६१७ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी १६९ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये हिंगणा रोड येथील पाच, गोरक्षण रोड येथील चार, पिंपळे नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जठारपेठ, खडकी, केशव नगर, बलवंत कॉलनी, राम नगर, मलकापूर, खदान, मॉऊन्ट कारमेल स्कूल व लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४७३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,६१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४७३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.