अकोला : जिल्ह्यात मंगळावार, २० आॅक्टोबर रोजी ३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,११६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये अकोट येथील सात, सिंधी कॅम्प येथील चार, सिटी कोतवाली व सांगळूद येथील प्रत्येकी तीन, सिरसोली, हिंगणा रोड, नेहरु नगर अकोट फैल, हनुमान बस्ती, बाळापूर, दगडखेड ता. बाळापूर, वसंतनगर कौलखेड, गवळीपुरा, कैलास टेकडी, न्यु राधाकिशन प्लॉट, मांजरी ता. बाळापूर, वाडेगाव, गौरक्षण रोड व रेणूका नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.४९६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,११६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:56 AM