शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७२५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता. पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पुर्णा येथील प्रत्येकी चार, मारोतीनगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसेनगर, वृंदावननगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडेनगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जुने शहर, खदाण, सांगवी बाजार, कान्हेरी सरप, हाता, पैलपाडा, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, पिंपळखुटा, मुकुंदनगर, न्यू तापडियानगर, अयोध्यानगर, कोठारी वाटिका, खेडकरनगर, तुकाराम चौक, यशवंतनगर, ग्रामपंचायतीजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रवीनगर, गिरीनगर, रामदास पेठ, गायगाव, बलोदे लेआउट, बोरगाव मंजू, टेलिफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकजनगर, अकशीलनगर, कलेक्टर ऑफिस, लहानउमरी, गोयंका लेआउट, हरिहर पेठ, दगडपारवा, महान, आळंदा, भेंडगाव, मोडकवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडकेनगर, महाकालीनगर, सिव्हिल लाइन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्रीनगर, नयागाव, बजरंग चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकारनगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समतानगर, जवाहरनगर, हनुमाननगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पिटल, अशोकनगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,७८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,५८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.