अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, बुधवार, ९ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९७४२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४६२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ येथील तीन जण, खदान व रामनगर येथील प्रत्येकी दोन, छोटी उमरी, रामदासपेठ, किर्ती नगर, अकोट, तोष्णिवाल लेआऊट, रसनापूर ता. बाळापूर, पारस, निमवाडी, तापडीया नगर, अकोला बसस्टॅण्ड, पातूर, गोरक्षण रोड, माळराजूरा ता. पातूर, सावरगाव ता. पातूर, जून राधाकिसन प्लॉट, सुधीर कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, व्दारका नगर, नायगाव, मलकापूर, बिर्ला कॉलनी, जसनागरा समोर, नवीन तारफैल, जूने लेबर कॉलनी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६९२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७४२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६९२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.