शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २९२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, गीतानगर व ज्योतीनगर येथील प्रत्येकी दोन, तर बार्शिटाकळी, माना, राजनखेड, अकोट, बोर्डी ता.अकोट, विवरा ता.पातुर, खदान, तुकाराम चौक, बाळापूर, कीर्तिनगर, श्रद्धानगर, सिंधी कॉलनी, तोष्णीवाल लेआउट, कपिलवस्तुनगर, जुने शहर, कौलखेड, बैदपुरा व अकोट फाइल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
३४ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले दोन अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६११ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,१५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.