शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून आरटीपीसीआर चाचण्यांचे ६५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील सहा, तोष्णीवाल लेआऊट येथील तीन, खदान येथील दोन, तर न्यू खेतान नगर, विद्युत कॉलनी, बाळापूर, सहित ता. बार्शीटाकळी, जनुना ता. बार्शीटाकळी, राजुराघाट धोत्रा, तापडिया नगर, पातूर, बार्शीटाकळी, केशवनगर, किनखेड, सिटी कोतवालीसमोर, आश्रय नगर, नंदापूर ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी रतनलाल प्लॉट व राममंदिरजवळ येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रॅपिड चाचण्यांमध्ये सहा पॉझिटिव्ह
रविवारी झालेल्या एकूण ६४ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६,१२६ चाचण्यांमध्ये १,८२५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,६६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८,७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.