शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४१३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये राम नगर येथील सात, मलकापूर, रणपिसे नगर व केशव नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, गोरक्षण रोड, गणेश नगर येथील प्रत्येकी दोन, तर देवगाव, ता. पातूर, उत्तम प्लॉट, बिसेन लेआऊट, रतनलाल प्लॉट, बिरला, न्यू तापडिया नगर, केळीवेळी, ता. अकोट, मोहम्मद अली चौक, कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
२७ जणांना डिस्चार्ज
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशनचा कालावधी समाप्त झालेले १० अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६१४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२४३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६१४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.