शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४४९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकीरोड, अकोट, व्हीएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी कॅम्प, जुने आरटीओ रोड, वाशिम बायपास, हरिहर पेठ, गीतानगर, गोरक्षण रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अदुरा, ता. बाळापूर व तापडियानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
२५ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, आयकॉन हॉस्पिटन येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १०, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५५७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,७७४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.