शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खदान, तेल्हारा, अकोट, शिवपूर, कान्हेरी सरप व दुर्गा चौक येथील प्रत्येकी दोन, राउऊवाडी, खेतान नगर, श्रीवास्तव चौक, जेल क्वॉटर, गुडधी, मराठा नगर, बार्शीटाकली, जवाहर नगर, कीर्ती नगर, लहान उमरी, राम नगर, रतनलाल प्लॉट, वणी रंभापूर, मूर्तिजापूर, रणपिसे नगर, डाबकी रोड, बाळापूर, जळगाव नहाटे ता. अकोट, वानखडे नगर व देशमुख फाईल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये आठ पॉझिटिव्ह
बुधवारी दिवसभरात झालेल्या ४३ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये आठ जण पॉझिटिव्ह आढळून आले. हे सर्व जण अकोट येथील रुग्ण आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण ३२ हजार ३४० चाचण्यांमध्ये २१२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
११ जणांना डिस्चार्ज
होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेल्या ११ जणांना शनिवारी दुपारनंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १०,६७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
७८१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,७९२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.