अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडीत होण्याची चिन्हे नसून, गुरुवार, २८ जानेवारी रोजी आणखी ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११,४९५ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील दोन, मुर्तीजापूर, कापसी रोड ता.पातूर, खेडकर नगर, अकोट फैल, राजपूतपुरा, जीएमसी, राऊतवाडी, रामदासपेठ, शिवाजी नगर, जठारपेठ, शिवार, राजखेड, संतोष नगर, अन्वी ता. मुर्तिजापूर, जूने शहर व पारस येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये अकोट व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, हिवरखेड, गोकुल कॉलनी व सरस्वती इंजी. स्कूल केशव नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गोरक्षण रोड, शास्त्री नगर, दहिगाव गांवडे ता.अकोट, केशव नगर, कौलखेड, जूने शहर, राजपूतपुरा, बंजारा कॉलनी, रणपिसे नगर, टेलीफोन कॉलनी, सहकार नगर व बलवंत कॉलनी येथील प्रत्येक एक पॉझिटिव्ह आढळून आले.
३२ कोरोनामुक्त
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून सात, बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १०, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,४९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,५१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.