शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५४३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५०४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खेतान नगर येथील ४, गीता नगर येथील ३, गोरक्षण रोड, लक्ष्मी नगर, लहरिया नगर, बलोदे ले-आउट व राम नगर येथील प्रत्येकी २, तर उर्वरित बाभूळगाव, काँग्रेस नगर, सांगवी खुर्द, तुकाराम हॉस्पिटल, बार्शीटाकळी, जठारपेठ, गायत्री नगर, शिवाजी नगर, पिंजर ता. बार्शीटाकळी, मचिंद्रा नगर, तोष्णीवाल ले-आउट, अकोट, विठ्ठल नगर, माधव नगर, तापडिया नगर, खडकी, हरिहर पेठ, हिंगणा फाटा, चौरे प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी अकोट शहर व तालुक्यातील पुंडा येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३७ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २२, अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५९४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,८७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.