अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, रविवार ३ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०५८४ वर पोहोचली आहे. दरम्यान आणखी २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ४४३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील सात, छोटी उमरी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गांधी चौक येथील चार, गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालयजवळ व अकोट येथील प्रत्येकी तीन, तहसिल ऑफीस, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, अलंकार मॉर्केट, खडकी, आळंदा ता. बार्शिटाकळी, जळगाव नाहाटे ता. अकोट, बेलूरा ता. अकोट, हरीहर पेठ, तऱ्हाळा, नकाशी ता. बाळापूर, कॉग्रेस नगर, कोठारी वाटीका मलकापूर, न्यु तापडीया नगर, खुफीया अपार्टमेन्ट, आदर्श कॉलनी, राजपूतपुरा व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
२२ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून चार, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून चार, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सात अशा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,५८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.