अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असून, मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ३१ जानेवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये आणि दुसºया हप्त्यात १५ फेबु्रवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदतीची रक्कम तहसील कार्यालयांमार्फत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी शासनामार्फत ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी २५ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ फेबु्रवारी रोजी दिला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय वितरित असा आहे मदतनिधी !तालुका रक्कमअकोला १४८१९२५००बार्शीटाकळी ९२३६७०००तेल्हारा ८७४२८४००बाळापूर ११४११५२००मूर्तिजापूर ११८४६६९००...........................................................एकूण ५६०५७००००दुष्काळी मदत पोहोचली १३७.६१ कोटींवर!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी आतापर्यंत तीन हप्त्यात शासनामार्फत मदतनिधी प्राप्त झाला. त्यामध्ये पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये, दुसºया हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये आणि तिसºया हप्त्यात ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतीचा आकडा १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे.