शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड,गीता नगर, मूर्तिजापूर व जुने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, देशमुख फैल, खडकी व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर राऊतवाडी, रचना कॉलनी, गजानन नगर, मोठी उमरी, शिवनगर, खोलेश्वर, अकोट, मोरद ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, तापडीया नगर, दीपक चौक, केडिया प्लॉट, अनंत नगर, केशवराज वेटाळ ता.पातूर, सिंधी कॅम्प, न्यू तापडीया नगर, सिव्हिल लाईन, भागवत वाडी, लहरिया नगर, जीएमसी हॉस्टेल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व जैन नगर डाबकी रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
१२२ जणांना डिस्चार्ज
आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, सूर्याचंद्र हॉस्पिटल येथून सहा, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १०४ अशा एकूण १२२ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७२४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,९३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.