अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ३० आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,९२९ वर पोहचली आहे. दरम्यान, आतापर्यंत १५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी २५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २६ महिला व ३९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोºहळ ता. बाशीर्टाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सौंदळा ता. तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.६३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,९२९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३१४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोला जिल्ह्यात आणखी ६५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९२९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:42 PM