अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,०६१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील आठ, मुर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यु तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शीटाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन, तर मांजरी, आदर्श कॉलनी, गोकूल नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेव नगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मुर्तिजापूर, कंझरा ता.मुर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.