शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राधाकिशन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर व्याळा ता. बाळापूर, रामनगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहरनगर, गीतानगर, आकाशवाणीनगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२ वर्षीय महिलेचा मृत्यू
सोमवारी अकोला शहरातील कबीरनगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये दोन पॉझिटिव्ह
सोमवारी दिवसभरात करण्यात आलेल्या १०१ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये केवळ दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत झालेल्या २७,०४१ चाचण्यांमध्ये १८६१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
९१ जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८२ अशा एकूण ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.