अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराने शनिवारी आणखी एक बळी घेतला, तर २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अकोट येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३०२ झाली आहे. दरम्यान, १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये खडकी व कापशी येथील प्रत्येकी दोन, आलेगाव, आपातापा, बोरगाव खु., आस्टूल ता. पातूर, तेल्हारा, भौरद, जीएमसी हॉस्टेल, उरळ, जवाहर नगर, मयूर कॉलनी, न्यू राधाकिशन प्लॉट व गायगाव येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी जठारपेठ येथील तीन, रणपिसे नगर येथील दोन, तर वाडेगाव, केडीया प्लॉट व मुलांचे वसतीगृह येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
अकोट येथील पुरुषाचा मृत्यू
शनिवारीअकोट येथील ६८ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
१९ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.