शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील चार, गणपती मंदिर, रामनगर व संतनगर प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट, अकोट, सिंधी कॅम्प व जठार पेठ येथील प्रत्येकी दोन, तर गोकूळ कॉलनी, सरस्वतीनगर, रचना कॉलनी, डाबकी रोड, हिंगणा फाटा, वसंत टॉकीज, आदर्श कॉलनी, बंजारानगर, राधाकिसन प्लॉट, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या डाबकी रोड भागातील ६५ वर्षीय महिलेचा मंगळवारी एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३२ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ११ अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६०१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२०६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.