अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, १४ मार्च रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०१ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४० , तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६६ अशा एकूण ४०६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,४६८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ८४३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३४०जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५०३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील ४८, मुर्तिजापूर येथील २८, चोहट्टा बाजार येथील १५, लहान उमरी येथील १२, तेल्हारा व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, खडकी व अकोली जहागीर येथील प्रत्येकी १०, खदान येथील नऊ, जठारपेठ व वैराट येथील प्रत्येकी आठ, वाडेगाव येथील सहा, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, कौलखेड, गुडधी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, खापरवाडा, पातूर, शास्त्री नगर, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार, केशव नगर, गायत्री नगर, सांगळूद, अकोट, अकोट फैल, जीएमसी व मोझर येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, रामदासपेठ, भारती प्लॉट, जूने शहर, मासा, निमवाडी, शासकीय निरिक्षणगृह, आनंद नगर, शासकीय महिला राज्यगृह, न्यु तापडीया नगर, रिले, रामटेक व पिकेव्ही क्वॉर्टर येथील प्रत्येकी दोन, पळसो बढे, नायगाव, आगर, उगवा, सांगवी खुर्द, तापडीया नगर, निबंधे प्लॉट, गावंडगाव, माधव नगर, कासली खुर्द, मिर्झापूर, भगीरथ नगर, पिंपलोड, पांढूर्णा, शंकर नगर, बापू नगर, संतोष नगर, सुर्या गार्डन, हिंगणा फाटा, म्हाडा कॉलनी, झेडपी कॉलनी, ढेकर नगर, इंद्रा नगर, जवाहर नगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, ज्ञानेश्वर नगर, शिवनगर, जोगळेकर प्लॉट, शिवचरण पेठ, खंडाळा, जयहिंद चौक, विद्या नगर, जीएमसी गर्ल्स होस्टल, दक्षता नगर, बाजोरिया हाऊस, सोळाशे प्लॉट, चैतन्य नगर, पंचशील नगर, शिवर, सोपीनाथ नगर, संता नगर, तारफैल, गुलजारपुरा, व्हीबीएच कॉलनी, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, अकोली, हरिहर पेठ, मराठा नगर, मुकूंदवाडी, गौतम नगर, आळशी प्लॉट, भौरद, पंचशिल नगर, वाझेगाव, धानोरी, कावसा, सिसो, द्रावहा, उमरी नाका, विझोरा, शिवापूर, कॉग्रेस नगर, राम नगर, माळीपूरा, राजीव गांधी नगर व यशवंत नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
करोडी येथील एकाचा मृत्यू
अकोट तालुक्यातील करोडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना ११ रोजी दाखल करण्यात आले होते.
५,४३९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,४६८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १५,६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,४३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.