अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरानाबळींचा आकडा ३४२ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,०६१ वर पोहोचली आहे. दरम्यान, १०८ जणांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील आठ, मुर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यु तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शीटाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन, तर मांजरी, आदर्श कॉलनी, गोकूल नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेव नगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मुर्तिजापूर, कंझरा ता.मुर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अडगाव येथील पुरुष दगावला
कोरोनावर उपचार घेत असलेल्या अडगाव बु. ता. तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना ७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१०८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, ओझोन हॉस्पीटल येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ८३ असे एकूण १०८ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६८० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,०६१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,०३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.