अकोला : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते असून, राज्य सरकार मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करत आहे. यापूर्वी सरकारने १,३२८ मृत्यू लपविले होते. ते जाहीर करावे लागले असून, आता आणखी १ हजार मृत्यू लपविले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.सोमवारी त्यांनी अकोल्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू हे महाराष्टÑात आहेत; मात्र राज्य सरकार गांभीर्याने काम करत नाही. कोरोनाशी लढाई करण्यापेक्षा हे सरकार आकड्यांशी खेळत असल्याचा आरोप करून या सरकारने १ हजार मृत्यूंची लपवाछपवी केली असून, या आकडेवारीचा शोध घेतला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी याची माहिती सरकारला दिली असून, त्यांनी २९ जूनपर्यंतची सर्व माहिती गोळा करून याबाबत माहिती दिली जाईल, असे सरकारने कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.सोयाबीन बियाणे न उगविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; मात्र कंपनी कायद्यानुसार त्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकºयांना अतिरिक्त मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भ वैधानिक मंडळाला एका ज्येष्ठ मंत्र्याचा विरोधविदर्भ वैधानिक मंडळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर एका ज्येष्ठ मंत्र्याने या मुदवाढीला विरोध केल्यामुळेच या मंडळाला मुदतवाढ मिळू शकली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. विदर्भातील सर्व मंत्री, आमदार व खासदारांनी या संदर्भात एकत्रित आवाज उठविला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.