अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, गुरुवार, १५ एप्रिल रोजी जिल्ह्यात आणखी सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५३९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३९ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ९२ असे एकूण ३३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३२,१७१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५५२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २०, कौलखेड येथील १८, मोठी उमरी येथील ११, जलालाबाद व मलकापूर येथील प्रत्येकी १०, लहान उमरी, डाबकी रोड, शास्त्री नगर व तापडीयानगर येथील प्रत्येकी सात, जवाहर नगर, जीएमसी येथील प्रत्येकी पाच, बाळापूर, खडकी, गोरक्षण रोड व जूने शहर येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, सिव्हील लाईन व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पारस, शिव कॉलनी, मुर्तिजापूर, आकाशवाणी मागे, किर्ती नगर, रजपुतपुरा, गीता नगर, खदान, रतनलाल प्लॉट, खेडकर नगर, पातूर, राजंदा, कमला नगर, सिंधी कॅम्प, केशव नगर, शंकर नगर, रणपिसे नगर व महान येथील प्रत्येकी दोन, तर कान्हेरी गवळी, शिवाजी नगर, पलोदी, ग्रीन व्हॅली, वाडेगाव, आसापूर, मोरेश्वर कॉलनी, वृंदावन नगर, गोयका लेआऊट, गुलजारपुरा, पथ्रोडी, पिंपलनेर, माता नगर, राऊतवाडी, देवरावबाबा चाळ, रिधोरा, गायत्री नगर, रेणूका नगर, मालीपुरा, आझाद कॉलनी, भवानी पेठ, उज्जैन, भगीरथनगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, रुपचंदा नगर, अकोली खुर्द, रेल्वे क्वॉर्टर, बाभूळगाव, वानखडे नगर, वाशिम बायपास, कळवेश्वर, अमानखॉ प्लॉट, आंबेडकर नगर, बलोदे लेआऊट, मेहकर, सातव चौक, कपिलवास्तू, शिरपूर, कृषी नगर, मराठा नगर, कलेक्टर हॉऊस, डिएचओ, राम नगर, राधाकृष्ण प्लॉट, शिवणी, मंगलवारा रोड, हिंगणा, शिवचरण पेठ, हिंगणा फाटा, वाघागड, वऱ्हाट बकाल, खोलेश्वर, व्दारका, गुल्लरघाट, वाडेगाव, लक्ष्मी नगर, राहेर, जठारपेठ, टाकळी, चांदुर, नयागाव, कंवर नगर, पिंपळखुटा, उजळेश्वर, तिवसा, सिसामासा, अंतुलेनगर, सिसा भांदखेड, टाकळी व अंजनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
चार महिला, तीन पुरुष दगावले
कावसा ता.अकोट येथील ६२ वर्षीय महिला, राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ५२ वर्षीय महिला, जुने नायगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, दोनद ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष, प्रसाद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला, जगजीवनराम नगर येथील ७५ वर्षीय महिला व निबंधे प्लॉट येथील ८० वर्षीय पुरुष अशा सात जणांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी झाली.
४,३२५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२,१७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,३०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५३९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,३२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.