लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहर व जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील एका प्रतिष्ठित भागात राहणार्या व्यक्तीमध्ये स्वाइन फ्लूचे लक्षण आढळून आल्यावर, त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्याच्या रक्ताचे व स्नॉबचे नमुने रुग्णालयाने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहर व जिल्हय़ात सातत्याने स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्ण वाढत आहेत. अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने, चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
स्वाइन फ्लूचा आणखी एक संशयित रुग्ण आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:40 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहर व जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...
ठळक मुद्देशहर व जिल्हय़ात वाढत आहे स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आलारुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट, खासगी रुग्णालयात उपचार सुरू