शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तापडियानगर, डाबकी रोड व शिवणी येथील प्रत्येकी चार, चतुर्भुज कॉलनी, कारंजा राम, ता. बाळापूर, विद्यानगर, जठारपेठ, मोठी उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, वानखडेनगर, गोरक्षण रोड, पातूर, खानापूर, ता. पातूर, गोकुल कॉलनी, कैलाश टेकडी, मलकापूर, जवाहरनगर, शास्त्रीनगर, गीतानगर, ज्योतीनगर, जीएमसी, गोडबोले प्लॉट येथील प्रत्येकी दोन, खेडकरनगर, खडकी, मनारखेड, हिंगणा फाटा, कलेक्टर ऑफिस, बोरगाव मंजू, ज्योतीनगर, रणपिसेनगर, न्यू राधेश्याम प्लॉट, चोहट्टा बाजार, नंदीपेठ, संतनगर, गुलशन कॉलनी, पास्टूल, निंभोरा, आाळसी प्लॉट, शिवणी, दहीहांडा, न्यू तापडियानगर, रामनगर, श्रीकृष्णनगर, अंबिकापूर, वृंदावननगर, म्हाडा कॉलनी, गणेशनगर, कौलखेड, लहान उमरी, तुकाराम चौक, लकडगंज, रामदासपेठ, अनिकेत चौक, रेल्वे कॉलनी, पिंजर, वाशिम रोड व त्र्यंबकनगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कौलखेड, राऊतवाडी, विद्यानगर, बाळापूर, अमानखा प्लॉट, बार्शिटाकळी व अकोट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तापडियानगर, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुषाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २८, अशा एकूण ४८ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
९२२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,४०५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ९२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.