अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवार ४ नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २८२ वर गेली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४८४ झाली आहे. दरम्यान, आणखी ११ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तीजापूर येथील चार, डाबकी रोड व वृंदावण नगर येथील प्रत्येकी दोन, तर बाळापूर, हेंडज ता. मुर्तिजापूर, कवठा ता. मुर्तिजापूर, कावसा ता. अकोट, शिवणी खु. ता. मुर्तिजापूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.७० वर्षीय महिलेचा मृत्यूबुधवारी लक्ष्मी नगर, डाबकी रोड, अकोला येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेस ३१ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.११ जणांची कोरोनावर मातबुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, बिºहाडे हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन व स्कायलार्क हॉटेल येथून तीन अशा एकूण ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२०१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८००१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २०१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.