अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहेे. सोमवार, १४ डिसेंबर रोजी अकोला शहरातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०४ वर गेला आहे, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,८८८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राधाकिशन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर व्याळा ता. बाळापूर, राम नगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहर नगर, गीता नगर, आकाशवाणी नगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२ वर्षीय महिलेचा मृत्यू
सोमवारी अकोला शहरातील कबीर नगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
७४३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७४३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.