अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ९ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०११ वर पोहचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २४३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१३ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आठ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा, केळकर हॉस्पिटल येथील पाच, खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.७५ वर्षीय महिलेचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाºयांची संख्या वाढतच असून, शनिवारी रात्री आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. ही ७५ वर्षीय महिला मूर्तिजापूर शहरातील तेलीपुरा भागातील रहिवासी असून, त्यांना ६ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. काल रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.५२१ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा आणखी एक बळी; ३० नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ३ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 12:15 PM