शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २९७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आदर्श कॉलनी येथील चार, मित्रा नगर व कमल टॉवर जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, मोठी उमरी, जठारपेठ व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर मलकापूर, जुने शहर, जामवसु ता. बार्शीटाकळी, धामनदरी ता. बार्शीटाकळी, गोरक्षण रोड, बेसेन रिंगरोड, पाथर्डी ता. तेल्हारा, शंकर रोड, साने गुरुजी नगर, कैलास नगर, तरोडा ता. अकोट, जवाहर नगर, न्यू महसूल कॉलनी व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
८३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
गुरुदत्त नगर, डाबकी रोड येथील ८३ वर्षीय पुरुषाचा बुधवारी उपचारादरम्यान मुत्यू झाला. त्यांना ५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३८ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २५ अशा एकूण ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६०९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,०१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.