अकोला : जिल्ह्यात मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २८३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५८५ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये टिष्ट्वन बंगला गौरक्षण रोड येथील चार जणांसह, गजानन पेठ राऊतवाडी येथील तीन, बार्शीटाकळी येथील दोन, पारस, भांबेरी ता. तेल्हारा, शास्त्री नगर, रामदास पेठ, पाकली, भागवतवाडी जूने शहर, मुर्तिजापूर, रणपिसे नगर व राम नगर येथील प्रत्येकी एक अशा १८ जणांचा समावेश आहे.५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यूमंगळवारी गजानन नगर, डाबकी रोड येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना २ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.२२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १८ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:11 PM