अकोला : कोरोना संसर्गाचाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी या जीवघेण्या आजाराचा विळखा सैल होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सोमवार, १३ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने पातूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९५ झाली. दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९०१ झाली असून, दिवसभरात ३६ जण कोरोनामुक्त झाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात ३१६ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या १५ जणांमध्ये सात महिला, आठ पुरुष आहेत. त्यात तीन जण पातूर येथील, दोन जण नवीन बसस्टॅण्ड जवळ, दोन जण गोरक्षण रोड, दोन जण अकोट, दोन जण मुर्तिजापूर तर उर्वरीत गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. हे सर्व सात जण मुर्तिजापूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.पातूर येथील एकाचा मृत्यूपातुर येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. या रुग्णास १ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.३६ जणांना डिस्चार्जदरम्यान, सोमवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर मधून १९ , आयकॉन हॉस्पिटल मधून पाच व हॉटेल रिजेन्सी येथून चार अशा ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत २५८ जणांवर उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल-३१६पॉझिटीव्ह-२२निगेटीव्ह- २९४
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८०+२१= १९०१मयत-९५(९४+१)डिस्चार्ज- १५४८दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २५८