अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५४, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २२३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १५,६१५ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९५१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७९७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २६, मुर्तिजापूर येथील १५, पातूर येथील १३, मासा येथील नऊ, जठारपेठ येथील सात, आदर्श कॉलनी, खेतान नगर, न्यु खेतान नगर, सिंधी कॅम्प, रामदासपेठ व नवेगाव ता.पातूर येथील प्रत्येकी चार, उन्नती नगर, बसंत नगर, बार्शीटाकळी, जूने शहर, भागवतवाडी येथील प्रत्येकी तीन, बाळापूर, भंडारज बु, संतोष नगर, कौलखेड, खडकी, श्रध्दा नगर, विझोरा ता.बार्शिटाकळी व पिंझरा येथील प्रत्येकी दोन, तर पळसो भदे, म्हैसांग, मलकापूर, केशव नगर, कृष्ण नगरी, संत नगर, लहरिया नगर, महसूल कॉलनी, बंजारा कॉलनी, गोरक्षण रोड, लहान उमरी, गणेश कॉलनी, गवलीपुरा, कारला ता.तेल्हारा, जवाहर नगर, बोरगाव मंजू, पिंपलखुटा, महागाव, दोनद बु., डाबकी रोड, शास्त्री नगर, हरीहरपेठ, कोठारी वाटीका, तापडीया नगर, जाजू नगर, रवी नगर, राधा उद्योग, अन्वी व मळसूर ता.पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या खापरवाडी ता. अकोट येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांना२१ रोजी दाखल करण्यात आले होते
३,३६३ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५,६१५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,८८८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,३६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.