अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १२ मे रोजी आणखी एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४४ झाली आहे. तर आणखी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९६३ वर पोहोचला आहे. दरम्यान, गुरुवार रात्री नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३३३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी १४४ अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथिल तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषिमातामंदिर जवळ, छोटी उमरी, गीतानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.बाळापूरातील एकाचा मृत्यूगुरुवारी रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेताना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या ४४ वर पोहचली आहे. यापैकी ४३ जणांचा कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झाला. तर एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे.नऊ जणांना डिस्चार्जगुरुवारी रात्री नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले.
प्राप्त अहवाल-१४४पॉझिटीव्ह-४९निगेटीव्ह-९५
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ९६३मयत-४४(४३+१),डिस्चार्ज- ५८६दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३३३