अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, बुधवार, ३ मार्च रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने, एकूण बळींची संख्या ३७३ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६७, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ८७ अशा एकूण ३५४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १७,३६९ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६८५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील १६, डाबकी रोड व कौलखेड येथील प्रत्येकी १३, मोठी उमरी येथील १२ व बार्शीटाकळी येथील ११, दोनद व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कॉग्रेस नगर, जठारपेठ, व वडाळी देशमुख येथील प्रत्येकी सात, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी सहा, आदर्श कॉलनी, राऊतवाडी व मुर्तिजापूर येथील पाच, बाळापूर, सहकार नगर, आळसी प्लॉट, तापडीया नगर व खदान येथील प्रत्येकी चार, खोलेश्वर, लहानउमरी, अकोट,जवाहर नगर, विद्या नगर, गायगाव, न्यु राधाकिसन प्लॉट व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पिंजर बार्शीटाकळी, राम नगर, संत नगर, सिव्हील लाईन, मलकापूर, यशवंत नगर, गांधी चौक, गीता नगर, कावसा, देवरावबाब चाळ, न्युभागवत प्लॉट, न्यु तापडीया नगर, विठ्ठल नगर, जेतवन नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, मार्डी, कान्हेरी सरप, राहीत बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, आबेंडकर नगर, गुलजारपुरा, शिव नगर, क्वॉटर, संतोष नगर, किर्ती नगर, गोडबोले प्लॉट, सेन नगर, सस्ती पातूर, ताजनापेठ, मित्रा नगर, श्रावगी प्लॉट, हिंगणा फाटा, विद्युत कॉलनी, मराठा नगर, रजपूतपुरा, नवरंग सोयायटी, भिमनगर, बाळापूर रोड, दुर्गा चौक, हरिहरपेठ, मुकूंद नगर, राधे नगर, राधाकृष्ण टाकीज, पिंपळखुटा, महसूल कॉलनी, गायत्री नगर, इमरॉल्ड कॉलनी, स्टेशन, टाकली खोज, बाळापूर नाका, कृषी नगर, उमरा, रेणूका नगर, देशमुख फैल, आश्रय नगर, तोष्णीवाल लेआऊट, पोलिस हेडक्वॉटर, मलकापूर, दत्ता कॉलनी, शास्त्री नगर, माधव नगर, हनुमान वस्ती, तेल्हारा, जूने शहर, गुडधी, न्यु तापडीया, लखमापूर टाकळी, डोंगरगाव, नयागाव, मालीपुरा, व्हीआयपी कॉलनी, नवीन गोडबोल प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
बोरगाव मंजू येथील महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या बोरगाव मंजू येथील एका ३३ वर्षीय महिला रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. या महिलेस २७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४,११० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,३६९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,८८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,११० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.