अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे सत्र सुरुच असून, रविवार ३१ जानेवारी रोजी अकोट येथील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३३६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४९ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,६१८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, गोरक्षण रोड येथील तीन, डाबकी रोड, मोठी उमरी, कौलखेड, मिट क्लासेस व पैलपाडा येथील प्रत्येकी दोन, लहान उमरी, बाळापूर, बोरगाव मंजू, पिंपळे नगर, शेलू बोंडे ता. मूर्तिजापूर, न्यू तापडीया नगर, राम नगर, गायगाव बाळापूर, कौलखेड जहांगीर, आंबेडकर नगर, पातूर, कपिलवस्तू नगर, गजानन पेठ, एमजी रोड, भंडारज बु., रणपिसे नगर, शास्त्री नगर, वैकेटेश नगर, ज्योती नगर, सिंधी कॅम्प, कोठारी वाटिका, विवरा कॉलनी, तापडीया नगर, म्हैसपूर, छावा व राम मंदिर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
रविवारी शनिवारपूरा, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
७३५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६१८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.